आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावातील युवा नेतृत्व, उद्योजक तथा श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदरचे चेअरमन देवेंद्र उर्फ सिताराम चंद्रकांत हडकर यांची काल मालवण येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी चिंदर शक्ती केंद्र प्रमुख पदी नियुक्ती जाहीर केली. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, बाबा परब, दिपक सुर्वे, विजय निकम, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. देवेंद्र हडकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
चिंदर शक्ती केंद्र प्रमुखपदी देवेंद्र हडकर….!












