झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागं करण्यासाठी ‘बँडबाजा बारात’ आंदोलन – मायकल डिसोझा

ठाकरे शिवसेनेमार्फत ८ ऑगस्टला होणार आंदोलन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शासकीय कामकाजात सुरू असलेल्या दिरंगाई व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून ठाकरे गट शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी ‘बँडबाजा बारात’ आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या ८ ऑगस्ट रोजी बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

“कुंभकर्णाला जागे करण्यासाठी ढोल वाजवले जातात, त्याचप्रमाणे झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ‘बँडबाजा बारात’ आंदोलन करण्यात येणार आहे,” असे म्हणत डिसोझा यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांमध्ये ढिसाळपणा, तक्रारी करूनही कार्यवाही नाही, ऐतिहासिक कारागृहाचे बांधकाम कोसळले असले तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बांधकाम विभाग आणि नगरपालिकेसह अनेक विभागांमध्ये अनेक तक्रारी आणि आंदोलने करूनही कामांमध्ये सुधारणा होत नसल्याचे ते म्हणाले.

याच निषेधार्थ ८ ऑगस्ट रोजी बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून या ‘बँडबाजा बारात’ आंदोलनाला सुरुवात होईल. मायकल डिसोझा यांच्यासोबत अशोक धुरी, शैलेश गवांडकर, शकबीर मणियार, आणि विलास टोसरकार हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

error: Content is protected !!