सर्वेश दळवी यांचे मुळात राजकीय आणि ठेकेदार म्हणून काही “अस्तित्व नाही”

कनेडी येथील ज्या बेनामी “आक्का” ठेकेदाराच्या टक्केवारीवर तुम्ही जगात आहात, त्या आक्काला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता, हे दळवी यांनी विसरू नये

युवासेना दारिस्ते शाखाप्रमुख विजय गावकर यांचा सर्वेश दळवी यांच्या व्यक्तव्यावर पलटवार

कणकवली (प्रतिनिधी) : सर्वेश दळवी यांचे मुळात राजकीय आणि ठेकेदार म्हणून काही अस्तित्व नाही, आपल्या वडिलांच्या वशिल्याने व बेनामी ठेकेदाराच्या छत्रछायेत राहून फक्त दिखाऊपणा करण्याचे काम सद्या सर्वेश दळवी करत आहे. आपल्या पक्षाचा पालकमंत्री असताना आपल्या स्वताच्या गावातील कामे हे पूर्ण करू शकत नाहीत, यावरून आपले अस्तिव किती आहे याकडे आधी दळवी यांनी बघावे, ज्या बेनामी ठेकेदारा बरोबर हे फिरत आहेत त्यांनेच यांच्या वडिलांचे अस्तित्व संपवले आहे. आता फक्त बेनामी ठेकेदाराच्या वरदहस्ताने आपले पोट भरण्यासाठी यांचे प्रयन्त चालू आहेत. मुळात सर्वेश दळवी यांनी हे विसरू नये की यांचा जो बेनामी ठेकेदार “आक्का” कनेडी येथे बसलेला असतो त्याला सुद्धा याआधी उत्तम लोके यांनी व शिवसेनेने चांगलाच चोप दिला होता हे लक्षात ठेवावे. दळवी यांची राजकीय आणि ठेकदाराची पातळी तालुक्यामध्ये सर्व स्त्रुत आहे. त्यामुळे उत्तम लोके यांच्यावर टीका करतेवेळी आपली पातळी काय आपली लायकी किती आहे हे विसरू नये, असे सडेतोड उत्तर यावेळी युवासेना दारिस्ते शाखाप्रमुख विजय गावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिले.

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी केलेल्या टीकेची झळ एवढी लागली की, पूर्ण फुगा गट विस्कळीत झाला. सत्य कटू असते हे यावरून त्यांनी स्वतः मान्य केले आणि यावर सर्वेश दळवी यांनी आपण आपल्या फुगा भरणाऱ्या फुगे वाल्याला कस खुश करायचं तर उत्तम लोके यांच्यावर टीका करून. पण आपली लायकी नसलेला ठेकेदार, नाटळ पंचक्रोशीतील जलजीवनची कामे अर्धवट सोडून पळ काढणारा ठेकेदार अशी या सर्वेश दळवीची ख्याती आहे. जल जीवनमीशन नळ योजनेच काम अर्धवट सोडून पळ काढणाऱ्या सर्वेश दळवीला, जिल्हा परिषद शाळा दारिस्ते न. 1 येथे ग्रामस्थ नळ योजनेच्या विषयावर चप्पलांचा हार घालून चांगलाच प्रसाद देणार होते. त्यावेळी याच उत्तम लोके यांनी आपला बजाव केला होता याची सर्वेश दळवी यांनी जाण ठेवावी व आपली लायकी किती आहे ती ठरवावी असा सल्ला विजय गावकर यांनी दिला.

सरकारी कामे घेऊन लोकांना विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांनी उत्तम लोके यांच्यावर टीका करतात हाच मोठा हास्याचा विषय आहे. लोके हे स्वावलंबी असून आपला व्यवसाय करत आहेत, तुमच्या सारखे कामाच्या टक्केवारीवर जगणारे नाहीत असा सणसणीत चपराक विजय गावकर यांनी दिली. काही वर्षांपूर्वी कणकवली शहरात “टायर चोरी” प्रकरण चांगलेच गाजले होते, या प्रकरणात नेमके कोण होते याची दळवी यांना आठवण करून द्यायची गरज नाही.

सब ठेकेदार सर्वेश दळवी आणि बेमानी ठेकेदाराच्या दलाली मुळे आत्महत्या करण्याचा उंबरठ्यावर येऊन टेकलेले आहेत. जर वेळ पडली तर व्हिडिओ आणि ऑडीओ पुराव्यासहित जग जाहीर करू शकतो. उत्तम लोके जे काही पालकमंत्र्यांवर बोलले ते सर्वेश दळवी यांच्या कामावरून पूर्ण तालुक्याला दिसून आलेले आहेच. पालकमंत्र्यांची नीतिमत्ता काय आहे हे आम्हाला पुराव्यानिशी जग जाहीर करता येईल, असा इशारा युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर यांनी दिला.

error: Content is protected !!