देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील इळये सडेवाडी अंगणवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर व जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व इळये उपसरपंच गुरूनाथ राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी इळये तंटामुक्ती अध्यक्ष शिवराम उर्फ भाई कदम, प्रसाद (बंड्या) रवींद्र कदम, अंगणवाडी सेविका सुषमा जाधव, मदतनीस संपदा पाताडे, विनायक धुरी आदींच्या उपस्थितीत रेनकोट वाटप करण्यात आले.
कणकवली तालुक्यातील शिरवल येथील प्राणजीवन सहयोग संस्थेने या आधीही आपल्या सामाजिक कार्यातुन नागरीकांना मदत केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप असो किंवा कोरोना काळात सिंधुदुर्गात मोफत सॅनिटायझर फवारणी असो प्राणजीवन सहयोग संस्थेने आपली समाजाप्रती असणारी जबाबदारी पार पाडली आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना फळे वाटप व वाफेची मशिन वाटपही संस्थेमार्फत करण्यात आली होती. यावर्षी प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप होत आहे. जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना हे रेनकोट वाटप होणार असून संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.












