आचरा (प्रतिनिधी) : चिंदर पालकरवाडी येथील रहिवासी सदानंद सोमा पालकर वय वर्षे 80 यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर भटवाडी-पालकरवाडी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माझा गांगेश्वर मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते तसेच चिंदर सेवा संघाचे सेवक शंकर पालकर यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
चिंदर पालकरवाडी येथील सदानंद पालकर यांचे निधन….!












