वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने श्री संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन आरती पारायण प्रवचन हरिपाठ हरी किर्तन महाप्रसाद जागर भजन या बरोबरच सोमवार दि. १७ राेजी सायं.५ या वेळेत ह.भ. प. श्रीपत बाबला धामणकर यांचे कीर्तन तर सायं ७ नंतर ह.भ.प.गणपत महाराज गांवकडकर यांचे किर्तन व रात्री १०.३० वाजता रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ मु.साळीस्ते यांचे जागर भजन. मंगळवार दि. १८ रोजी सकाळी ह.भ.प.भरत महाराज वाजे अलिबागकर पंढरपूर यांचे प्रवचन व रात्री किर्तन शिवाय सकाळी १० वाजता ह.भ.प.तुकाराम महाराज शिंदे यांचे गुलालाचे किर्तन आणि रात्री श्री.संत गोरोबाकाका प्रासादिक मंडळ कुंभारवाडी चे जागर भजन. बुधवार दि.१९-०४-२०२३ रोजी सकाळी ८ वाजता श्रीमद् ज्ञानेश्वरीचे पुजन सांगता, सकाळी १० वाजता ह.भ.प.गुरुवर्य नारायण दादा महाराज यांचे काल्याचे किर्तन याबरोबरच मंगळवारी दि.१८ रोजी सायं. हळदीकुंकू व मान्यवरांचा सत्कार समारंभ, बुधवार दि.१९ रोजी सायं ४ नंतर समर्थ ढोल पथक मु.पो.ताम्हाणे ता.राजापुर यांच्या गजरात पालखी मिरवणूक संपन्न होणार आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी व भावीकांनी कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन











