वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या दोडामार्ग शाखेचे 16 एप्रिल रोजी उदघाटन

सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत 10 वी शाखा ग्राहकांच्या सेवेत होणार दाखल

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट शाखेच्या दोडामार्ग शाखेचे उद्या रविवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता उदघाटन होत आहे.हडीकर्स आपाजी प्लाझा बांदा दोडामार्ग रोड, बाजारपेठ दोडामार्ग येथे वैश्य समाज पतसंस्थेची दोडामार्ग शाखा ग्राहकांच्या सेवेत दाखल होत असून दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर, कसई दोडामार्ग सहाय्यक निबंधक अनिल क्षिरसागर यांच्या हस्ते पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर यांच्या अध्यक्षतेखाली दोडामार्ग शाखेचे उदघाटन सायंकाळी 4 वाजता होणार आहे.यावेळी कसई दोडामार्ग चे खरेदी विक्री संघ अध्यक्ष संतोष नानचे, दोडामार्ग तालुका वैश्य समाज अध्यक्ष सागर शिरसाट, दोडामार्ग व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष लवू मिरकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण,जि प माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भेडशी येथील उद्योजक दत्ताराम टोपले,भेडशी ग्रामविकास कमिटी अध्यक्ष तुकाराम टोपले आदी प्रमुख उपस्थित असणार आहेत. दोडामार्ग शाखा उदघाटन निमित्ताने सकाळी 10 वाजता सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, व्हाईस चेअरमन सुभाष भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर आणि सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!