…तर शिवसेना स्वबळावर लढणार

शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे सावंतवाडीत सूतोवाच

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक शिवसेना प्रसंगी स्वबळावर लढेल असे सूतोवाच शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सावंतवाडी येथे केले. राज्यमंत्री योगेश कदम हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही महायुती अथवा स्वबळावर लढायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पण जर निर्णय झाला नाही तर प्रसंगी शिवसेना स्वबळावर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था लढेल असे सूतोवाच राज्यमंत्री कदम यांनी केले. मंत्री कदम यांच्या प्रसंगी स्वबळाच्या नाऱ्याने सिंधुदुर्गात भाजपा आणि शिवसेनेत पुन्हा निवडणूक बाबत मतांतरे असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!