आचरा (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामे गेल्या १ महिन्या पासून बंद आहेत. ग्रामीण भागात मजूरांना काम मिळवून देणे, कामाची मागणी, जॉब कार्ड देणे, एक काम एक संचिका, १ ते ७ नमुने आदी रेकॉर्ड सांभाळणारे ग्रामरोजगार सेवक राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सामील झाले आहेत. ३/१०/२०२४ शासन निर्णयानुसार ८००० मानधन व इतर भत्तेही मिळालेले नाही. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आदींना वारंवार पत्रव्यवहार संघटनेकडून करण्यात आहेत. या योजनेचा मुख्य दुवा ग्रामरोजगार सेवक असून फळबाग लागवड, बांबू लागवड, सिंचन विहीर, घरकुल, गांडूळ युनिट, गुरांचे गोटे आदी कामे अपूर्णावस्थेत आहेत. लाभार्थी व मजूरांनवर उपासमारीची वेळ आली आहे. जो पर्यंत थेट खात्यात मानधन जमा होत नाही तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे ग्रामरोजगार सेवक जिल्हा सचिव विष्णू माणगांवकर, मालवण तालुकाध्यक्ष दिंगबर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार हमीची कामे ठप्प












