कॅरम स्पर्धेत कासार्डेचा श्रीकृष्णा राठोड अव्वलस्थानी

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कासार्डे प्रशालेच्या ५ खेळाडूंची निवड

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलाच्या वयोगटात श्रीकृष्णा राठोड इ. ८ वी याने प्रथम क्रमांक पटकावला तर सार्थक वायंगणकर इ. ७ वी याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात सार्थक तळेकर इ. १२ वी विज्ञान याने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे तर १४ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात सारा कदम इ. ८ वी हिने तृतीय क्रमांक पटकावला तर १९ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात सेजल बापर्डेकर इ. १२ वाणिज्य हिने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे

कणकवली तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा दि. ९ व १० सप्टेंबर रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे पार पडली.
या यशस्वी पाच खेळाडूंची जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे २३ व २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रा. विनायक पाताडे, नवनाथ कानकेकर, क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा. अनिलकुमार जमदाडे व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबई अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती पदाधिकारी तसेच सर्व संस्था पदाधिकारी आणि पालक शिक्षक समिती पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या प्राचार्या भाग्यश्री बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!