वैभववाडीत 27 सप्टेंबर रोजी सहकार मेळावा, अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे – चेअरमन प्रमोद रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुकास्तरीय सहकार मेळावा २७ सप्टेंबर रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपनिबंधक बाळ परब उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिली.

वैभववाडी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना रावराणे पुढे म्हणाले, तालुकास्तरीय सहकार मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा संघाचे अध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप, प्रभाकर सावंत, तुळशीदास रावराणे आदी उपस्थित राहणार आहेत. सहकार मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी सर्व संचालकांनी प्रत्येक गावातील सोसायटी व ग्रामपंचायतीला भेट देऊन सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना आमंत्रण दिले आहे. त्यामुळे हा सहकार मेळावा भव्यदिव्य होईल असा विश्वास प्रमोद रावराणे यांनी व्यक्त केला आहे. तर यावेळी शेती व पशुपालन त्याच प्रमाणे शेतीत नवीन प्रयोग करून आर्थिक प्रगतीकरणाऱ्या सहा शेतकन्यांचा गौरव पालकमंत्राच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे, व्हाईस चेअरमन अंबाजी हुंबे, व्यवस्थापक सिद्देश रावराणे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलिप रावराणे, संघांचे संचालक दिगंबर पाटील, पुडलिक साळूंखे, सीमा नाणीवडेकर, उज्वल नारकर, महेश रावराणे, महेश गोखले, राजू पवार, रमेश शेळके, रितेश सुतार, संतोष पेडणेकर, सचिन कोलते, आदी संघांचे संचालक उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँक संचालक दिलिप रावराणे यांची बँकचे प्रतिनिधी म्हणून वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळावर निवड झाली आहे. याबद्दल यावेळी त्यांचा चेअरमन प्रमोद रावराणे व संचालक मंडळाच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!