ईनामदार श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथे गणेशोत्सवानिमित्त २७ सप्टेंबर रोजी भव्य एकेरी नृत्य स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथे ३९ दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त भाविकभक्त, रसिक प्रेक्षकांना साठी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच आयोजकांन कडून उपलब्ध करून दिली आहे. यानिमित्ताने शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ठीक ९.०० वाजता आचरा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे भव्य एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे हे ३५ वेळ वर्ष आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – रोख रु. २१०००/- व चषक, द्वितीय क्रमांक – रोख रु. १५०००/- व चषक, तृतीय क्रमांक – रोख रु. ११०००/- व चषक, उत्तेजनार्थ – १) रोख रु. २०००/- व चषक, २) रोख रु. २०००/- व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहेत.
१) स्पर्धा रात्रौ ठीक ९.०० वाजता सुरू होईल.
२) सदर स्पर्धक हा वय वर्ष १० च्या वरील असावा.
३) सादरीकरण करत असलेले गाणे तीन मिनिटांच्या वरती असावे.
४) ईनामदार श्री देव रामेश्वराचे पवित्र स्थान असल्यामुळे तोकड्या कपड्यातील/अश्लील नृत्य चालणार नाही.
५) स्पर्धकांनी आपली सहभाग नावनोंदणी व गाण्याचे नाव संपर्क प्रमुखांकडे द्यावे.
६) प्रथम जो स्पर्धक गाणं देईल, ते गाणं त्याच स्पर्धकासाठी लॉक करण्यात येईल. ते गाणं दुसऱ्या स्पर्धकांना घेता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
७) कोणत्याही स्पर्धकाने मागील वर्षाच्या गाण्याची पुनरावृत्ती करू नये.
८) स्पर्धकांनी निवडलेले गाणे हे mp3 स्वरूपात संपर्क खालील क्रमांकावर २४ सप्टेंबर पर्यंत पाठवावे.
९) स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांनी रंगभूषा व वेशभूषा करून रात्रौ ठीक ९.०० वाजता हजर राहावे.
१०) नृत्य सादरीकरणाचे क्रम हे स्पर्धेच्या ठिकाणी रात्रौ ९.०० वाजता चिठ्ठीद्वारे काढण्यात येतील.
११) स्पर्धेचे नियम बदलण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील.
१२) स्पर्धेचा अंतिम निर्णय हा माननीय परीक्षक व आयोजक यांच्याकडे असेल.
१३) स्पर्धकांना परीक्षणासंबंधी काही प्रश्न असतील तर स्पर्धा झाल्यावर परीक्षकांना भेटून त्याचे निरसन करावे. कृपया त्यानंतर परीक्षक किंवा आयोजक यांना फोन करून कुठलाही त्रास देऊ नये.

या स्पर्धेसाठी राजन पुजारे, बाबू हडकर, प्रकाश मेस्त्री, दिपक सुर्वे, विनोद गवळी, यल्लाप्पा गुरव, जयदीप पाटील, धुळाजी कर्पे, वसंत देसाई, सुशल देसाई, भाऊ हडकर, प्रसाद कावले, मनोहर शाहा हे प्रायोजक असून अधिक माहितीसाठी आयोजक विजय उर्फ बाबू कदम – ९४२१५७४७००, तेजस्विता – ९४०४४५७८३५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!