जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत युवराज गांवकरला सुवर्णपदक

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा विद्यार्थी युवराज शिवाजी गांवकर याने जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत युवराज गांवकर याने १९ वर्षाखालील ५० किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली. युवराज गेल्या अनेक वर्षापासून किक बॉक्सिंग चा सराव करत असून प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक बयाजी बुराण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून या त्याच्या सुवर्णमय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत,शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींनी त्याला सुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

error: Content is protected !!