सिंधुदुर्गात पहिल्यांदाच फॅशन आणि इंटिरियर विद्यार्थ्यांसाठी भव्य कार्यशाळा!

फ्लोरेट कॉलेज कणकवलीच्या वतीने दोन दिवसीय वर्कशॉप – उद्योगतज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फॅशन आणि इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग, कणकवली यांच्या वतीने ‘व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखत शिष्टाचार व व्यावसायिक आचारसंहिता’ या विषयावर दोन दिवसीय भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ आणि १६ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत आयोजित केली जाणार आहे. या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ निधी गौर पंकज, इंदोर (१८ वर्षांचा अनुभव) आणि स्नेहा सिंह, मुंबई (१२ वर्षांचा अनुभव) प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकासासाठी संवादात्मक व्याख्याने आणि प्रत्यक्ष कृती सत्रे घेण्यात येतील.

सिंधुदुर्गात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फॅशन आणि इंटिरियर डिझाईन विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ही संधी सोडू नये. आजचा दिवस तुमच्या भविष्यास दिशा देणारा ठरू शकतो, असे आवाहन कॉलेजच्या संचालिका सार्था किशोर कदम यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व युवक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!