चौके व्यापारी संघटना अध्यक्षपदी नितीन गावडे यांची निवड

उपाध्यक्षपदी रमेश सावंत भूषण गावडे तर सचिवपदी पुरुषोत्तम आचरेकर यांची निवड

चौके (प्रतिनिधी) : आदर्श व्यापारी संघटना चौके या संघटनेची वार्षिक सभा श्री देवी भराडी मंदिर चौके येथे पार पडली. या सभेत व्यापारी संघाचे कर्तुत्ववान अध्यक्ष नंदकुमार राणे यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या या रिक्तपदी गेली अनेक वर्षे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले नितीन गावडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी भूषण गावडे व रमेश उर्फ बाबू सावंत व सचिव पदी पुरुषोत्तम उर्फ भाई आचरेकर यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली.

आदर्श व्यापारी संघ चौके या संघटनेची वार्षिक सभा संघाचे सचिव रमाकांत उर्फ नाना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौके ग्रामदेवता श्रीदेवी भराडी मंदिर येथे नुकतीच पार पडली. या सभेत पुढील दोन वर्ष कालावधीसाठी नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह कार्यकारणी निवड, वार्षिक जमा खर्च, तसेच पुढील नियोजित कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. या सभेस मार्गदर्शक उद्योजक राजन गावडे, संतोष गावडे,बिजेंद्र गावडे, सचिन आंबेरकर यांच्यासह बाजारपेठेतील जेष्ठ हॉटेल व्यवसायिक बबन आंबेरकर,भाई गावडे,सुनील आंबेरकर,बाबाजी मेस्त्री,प्रकाश गावडे,गोविंद गावडे,दादा गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.यावेळी नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!