दिनांक १५ ते २२ ऑक्टोबर शिवसेने पक्षाचा उपक्रम
दिवाळी निमित्त बचतगट उत्पादने प्रदर्शन व विक्री
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण विभागातील महिला बचतगट व छोटे व्यावसायिक/उद्योजक यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे प्रथमच भव्य दिवाळी बाजारचे आयोजन करण्यात आले असून दि. १५ ते २२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे. याचा संधीचा फायदा नागरिकांना घ्यावा, असे आवाहन शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
खारेपाटण एस. टी. बस स्थानक समोरील तळगावकर कॉम्प्लेस येथे भरविण्यात आलेल्या या बाजारामध्ये दिवाळी साहित्य, फराळ, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी अशा विविध वस्तू आपल्या बचत गटा मार्फत विकण्याची सुवर्ण संधी महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या दिवाळी बाजारामध्ये मध्ये आपला स्टॉल लावण्यासाठी महिला बचत गट कार्यकर्त्यांनी शिवसेना पदाधिकारी मंगेश गुरव – 9422433760, सुहास राऊत – 9595712121, महिला बचत गट सी. आर. पी. आस्था पाटणकर – 9325327693 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन दिवाळी बाजार आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












