आशिये येथील युवती बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील आशिये गुरववाडी येथील नुपूर विठ्ठल देवळी ( वय 18 ) ही 11 ऑक्टोबर रोजी सकाळी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने बेपत्ता असल्याची खबर तिचे वडील विठ्ठल श्रीकृष्ण देवळी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
नुपूर हि शनिवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी आली नाही त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात जात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे . नुपूर हिने अंगात मोती कलरचा टॉप काळ्या रंगाची लेगीज घातली आहे. उंची पाच फूट चार इंच, रंग गोरा बांदा सडपातळ, गळ्यात चांदीची चैन अशी तिचे वर्णन आहे. तरी अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलिस ठाणे दूरध्वनी क्रमांक 02367-232033 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!