आद्या जुवेकर ठरल्या पैठणीच्या मानकरी!

आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंबच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमांमध्ये आद्या जुवेकर पैठणीच्या मानकरी ठरल्या. मंडळाच्या आजीव सभासद स्वप्नजा साटम यांनी पैठणी स्पर्धा पुरस्कृत केली होती. स्पर्धेसाठी आकर्षक चषक श्री जयंती देवी अजिंक्यतारा क्रिकेट संघाकडून पुरस्कृत करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, दिपक आपकर, अशोक जुवेकर, देवस्थान मानकरी राजन पुजारे, पिठ्या सावंत, चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे, बबन पुजारे, अमित पुजारे, हितेश सावंत, अक्षय परब, शेखर पुजारे, बहुसंख्य महिला वर्ग आदी उपस्थित होते.

मंडळाच्या आजीव सभासद पुजा मुणगेकर व पोलिस पाटील पुनम गोलतकर यांच्या हस्ते पैठणी सुपूर्द करण्यात आली. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत गावातील अनेक देवदेवतांची रूपे साकारत उपस्थिताची मने जिंकली. पळसंब शाळा नं. १ ने आपल्या कलागुणानी रंगमंच गाजवला. उद्योजक सचिन माणगावकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंबच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!