खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून अस्मि प्रशांत लाड भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून वायंगणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी भारतीय जनता पार्टी (भाजप) कडून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात सत्ताधारी भाजप पक्षातच उमेदवारी वरून महिला कार्यकर्त्यांची चढाओढ पहायला दिसत आहे.

अस्मि लाड या सध्या वायंगणी गावच्या सरपंच म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात गावात पायाभूत सुविधा, रस्ते बांधकाम, नळपाणी योजना, स्वच्छ भारत अभियान, महिला बचतगटांचे बळकटीकरण, तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. तर गेल्या दोन ते तीन वर्षांत शासनाच्या विविध योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी गावाच्या विकासासाठी आणण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. या कामगिरीमुळे वायंगणी ग्रामपंचायत तालुक्यात आदर्श म्हणून ओळखली जात आहे.

तसेच अस्मि लाड यांच्या या यशामागे त्यांचे पती प्रशांत लाड यांचे महत्त्वाचे योगदान आहे. प्रशांत लाड हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे वैयक्तिक सहाय्यक (P.A.) म्हणून कार्यरत असून त्यांचे मंत्रालयातील वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. या सशक्त राजकीय आणि प्रशासकीय नेटवर्कचा लाभ अस्मि लाड यांच्या पुढील राजकीय वाटचालीस होणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!