डामरे ग्रामदैवत देव गांगो अनभवानी मातेचा यात्रोत्सव 21 नोव्हेंबर रोजी

देवगड (प्रतिनिधी) : शिर्डीच्या साईबाबांनंतर पाण्यावर दिवा पेटवणारे जागृत दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा वार्षिक यात्रोत्सव दिनांक 21 नोव्हेंबर, 2025 रोजी संपन्न होत असून या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदिवशी रात्री गावातील मानकरी देवी अनभवानीच्या उगमस्थानावरून पाचशेर पाणी वाजत गाजत मंदिरात आणतात. रात्री अकरा वाजता ते पाणी कोहाळ्यात ओतून पेटविले जाते. रात्रभर हे पाणी पेटत असते. भाविकांना या शिवकालीन असणाऱ्या भवानी मातेचा अनुभव यायला लागला म्हणून तिला अनभवानी असे संभवण्यात येऊ लागते.

यात्रेनिमित्त सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व ग्रामस्थांच्या वतीने चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!