खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रवीण दिगंबर लोकरे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या वतीने नुकताच त्यांचा शाळेच्या संस्था कार्यालयात सरपंच प्राची ईसवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, संस्थेचे नवनिर्वाचित संचालक व सचिव महेश कोळसुलकर, संचालक व खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, संचालक विजय देसाई, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुख्याध्यापक संजय सानप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण लोकरे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रवीण लोकरे यांनी शिक्षण संस्थेच्या वतीने खारेपाटण ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!