तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : 26 /11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ वैभववाडी तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर, 2025 रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे करण्यात आले आहे. आपल्या रक्ताचा एक थेंब अनेकांचा जीव वाचवू शकतो. आपल्या रक्तातून कुणालातरी नवे आयुष्य मिळू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी 26/ 11 रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे हिंदू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडीचे राजेश पडवळ यांनी केले आहे.












