उद्या आचरेकर प्रतिष्ठान येथे ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाच्या शोचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणवासीयांचे स्वप्न, कोकणवासीयांच्या व्यथा, कोकणवासीयांचे वास्तव याचे दर्शन घडवणारा, माती आणि नाती जोडणारा चित्रपट अशा शब्दांमध्ये चित्रपट समीक्षकांनी गौरवलेला आणि चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरलेला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ पाहण्याची संधी पुन्हा एकदा कोकणवासीयांना मिळते आहे. विजय कलमकर या युवा दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. स्पंदन सिनेमा परिवार गेली काही वर्ष सातत्याने युवकांमध्ये चित्रपट विषयक जागृती आणि करिअर घडवण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देत आहे. अशाच प्रशिक्षणार्थीच्या चळवळीमधून हा चित्रपट तयार झाला आहे. खास लोकाग्रहस्तव ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचा एकच शो कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार, दि. २२ नोव्हेंबर, २०२५ रोजी, रात्री ९.०० वाजता वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृह, कणकवली येथे या शोचे आयोजन केले आहे. यासाठी देणगी प्रवेशिका दर केवळ शंभर रुपये असा ठेवला आहे. कणकवली बाजारपेठेतील अशोक करंबेळकर यांचे दुकान तसेच गुरुकृपा झेरॉक्स दुकानामध्ये चित्रपटाच्या देणगी प्रवेशिका उपलब्ध असतील. चित्रपट रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रपटाचे लेखक निर्माते अमरजीत आमले तसेच स्पंदन सिनेमा परिवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!