26 नोव्हेंबर रोजी वैभववाडी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ठीक दहा वाजता संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात येणार असून या कार्यक्रमास अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीचे विद्यार्थी शिक्षक तसेच कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक नादकर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विद्यार्थ्यांना संविधान विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 26/11 मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच माता रमाई महिला मंडळाच्या सरचिटणीस रुचिता कदम यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार संघाच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, चिटणीस रवींद्र पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!