खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त दिगंबर राऊत यांजकडून प्रशालेस १००००/- ची देणगी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त दिगंबर राऊत यांजकडून नुकतीच प्रशालेसाठी १००००/- रुपयांची रक्कम देणगी स्वरूपात भेट देण्यात आली. त्यांच्या या आर्थिक व सामाजिक दस्तृत्वाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. दिगंबर राऊत हे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रस्थानी असतात. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी १०००० रुपये रक्कम प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांच्याकडे नुकतीच सुपूर्द केली.

यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर व संस्थेचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. दिगंबर राऊत यांनी प्रशालेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी त्यांचे शाळा व संस्थेच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!