तळेरे (प्रतिनिधी) : आदर्श व्यापारी संघटना, तळेरे या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ डिसेंबर २०२५ रोजी कल्याणकर काॅम्प्लेक्स येथे पार पडली. या सभेमध्ये प्रामुख्याने संघटनेच्या महत्त्वाच्या विषयांबरोबरच नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी चंद्रकांत उर्फ राजू जठार आणि कार्याध्यक्षपदी अमोल सोरप तर सेक्रेटरी पदी श्रीधर (आप्पा) कल्याणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
आदर्श व्यापारी संघटना, तळेरेची नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे :- अध्यक्ष – चंद्रकांत (राजू) जठार, कार्याध्यक्ष – अमोल सोरप, सेक्रेटरी – श्रीधर उर्फ आप्पा कल्याणकर, सहसेक्रेटरी – आदित्य महाडिक, उपाध्यक्ष – चंद्रशेखर डंबे, खजिनदार – सागर डंबे, सहखजिनदार – अशोक तळेकर.
तर सल्लागार म्हणून – हनुमंत तळेकर, राजेंद्र पिसे, दशरथ कल्याणकर, अभय भांबुरे, नामदेव वाडेकर, प्रविण वरुणकर, वैभवकुमार कल्याणकर, भाई लडगे यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सचिन वाडेकर, भरत राठोड, सचिन पिसे, सूरज बिद्रे, निखिल जमदाडे, जयेश ढेकणे, विश्वनाथ पेडणेकर, चंद्रकांत जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध विषयावरती त्याचबरोबर अन्य विषयांवरती विचारविनिमय करण्यात आला. शेवटी संपूर्ण नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.










