चिंदर पंचक्रोशीत बीएसएनएल मोबाइल सेवेचा खेळखंडोबा

जिल्हा प्रबंधकांचे प्रकाश मेस्त्री मित्रमंडळाने वेधले लक्ष

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर पंचक्रोशीत वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेमुळे ग्राहक, विद्यार्थी, ऑनलाईन काम करणारा नोकर वर्ग हैराण झालेला आहे. उद्योजक प्रकाश मेस्त्री मित्र मंडळाने जिल्हा भारत संचार निगम लिमिटेड सहाय्यक जिल्हा प्रबंधक संगीता बोंडाळे यांच्याकडे हे निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच फुटाणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. यावेळी संतोष अपराज व विवेक परब उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, चिंदर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील भटवाडी (ग्रामपंचायत नजिक) येथे बीएसएनएल मोबाईल टॉवर उभारलेला असून सदरचा टॉवर पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने तसेच वारंवार नेटवर्क जात असल्याने मोबाईल ग्राहकांची फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे काही भागात बीएसएनएल मोबाईल टॉवरचे 2G/3G/4G नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अत्यावश्यकता असल्यास संपर्क करता येत नाही. तरी आपल्या बीएसएनएल मोबाईल टॉवर 2G/3G/4G नेटवर्क पूर्ण क्षमतेने चालू करावा व येणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

तसेच चिंदर अपराज कोंडवाडी येथे बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप बीएसएनएल मोबाईल टॉवर पूर्ण क्षमतेने चालू करण्यात आलेला नाही. तरी सदर बीएसएनएल मोबाईल 2G/3G/4G नेटवर्क टॉवर लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने चालू करावेत. त्याच प्रमाणे बांदिवडे व आचरा (शिक्षक कॉलिंनी) येथील टॉवरची क्षमता वाढवल्यास ग्राहक, विद्यार्थी, नोकरवर्ग यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.

error: Content is protected !!