ग्राहक पंचायत आयोजित निबंध स्पर्धेत वैदेही पाताडे प्रथम

उद्या राष्ट्रीय ग्राहक दिना दिवशी होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात वैदेही पाताडे (कासार्डे माध्य. विद्यालय) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

माध्यमिक गटांत आयोजित या निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी) विषय ग्राहक शिक्षण काळाची गरज व ग्राहक जागृतीचे नवे शिल्पकार असे होते. या स्पर्धेत द्वितीय श्रेया प्रवीण कदम (विद्यामंदिर प्रशाला, कणकवली), तृतीय आर्या सुनील पावले (एस. एम. हायस्कूल) व संकल्प नरेंद्र चिंदरकर (माध्य. विद्यामंदिर कनेडी) तर उत्तेजनार्थ सीमा किशोर चव्हाण (माध्य. विद्यालय बिडवाडी) व यशश्री मेस्त्री (सरस्वती हायस्कूल नांदगाव) स्पर्धकांना बुधवार दि. २४ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ठिक १०.३० वा. मा. तृप्ती थोडमिसे (जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मोहन दहीकर (जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग), रविंद्र खेबुडकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग), शुभांगी साठे (अपर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग) व इंदुमती मालुष्टे (अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग) यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हा मुख्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व विजयी स्पर्धकांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र कणकवली तालुका शाखेच्या तालुकाध्यक्षा श्रद्धा कदम, उपाध्यक्षा गीतांजली कामत, संघटक जनार्दन शेळके व सचिव पूजा सावंत, सहसचिव विनायक पाताडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!