नेहा बापट यांचा को. म. सा. प. आदर्श कार्यकर्ती पुरस्काराने सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बिडये विद्यामंदिर केंद्र शाळा आचरा नं. १ येथे रविवार २१ डिसेंबर रोजी ‘करूळचा मुलगा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि बिज अंकुर अंकुरेच्या १८ लेखकांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या सेवाभावी कार्यकर्त्या आचरा पारवाडी येथील नेहा नंदकुमार बापट यांना कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या “आदर्श कार्यकर्ती पुरस्कारा” ने कोकण मराठी साहित्य परिषद मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर रुजारीओ पिंटो, मंदार सांबारी, प्रकाश पेडणेकर, श्री. हिर्लेकर, सुधाकर वळंजू, बाबाजी भिसळे आदी को. म. सा. प. कार्यकर्ते उपस्थित होते. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!