४ जानेवारी रोजी ‘वैभववाडी श्री’ चा जलवा!

जिल्हास्तरीय नामवंत खेळाडूंचा सहभाग; बँकॉकमध्ये तिरंगा उंचावणारा अमित कदम आणि जिल्हास्तरीय मेन फिजिकचे आकर्षण

यंगस्टार मित्र मंडळ वैभववाडीचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा सहभाग असलेली, मानाची जिल्हास्तरीय मेन फिजिक व शरीर सौष्ठव स्पर्धा ‘वैभववाडी श्री २०२६’ चे आयोजन ४ जानेवारी, २०२६ रोजी वैभववाडी बाजारपेठमध्ये करण्यात आले आहे. वैभववाडी यंगस्टार मित्र मंडळाने महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शरीरसौष्ठव स्पर्धकांना स्पर्धामंच तसेच प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

यासाठी या स्पर्धेमध्ये एकूण पाच गट असून, 50 ते 55 किलोग्रॅम, 55 ते 60 किलोग्रॅम, 60 ते 65 किलोग्रॅम, 65 ते 70 किलोग्रॅम आणि 70 किलोग्रॅमवरील तसेच मेन फिजिक एकच गट असेल. स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षिस रक्कम, ट्रॉफी, मेडल्स आणि प्रमाणपत्राने गौरविण्यात येईल. यासाठी रवी तांबे (९५५२४६६२६७) यांच्याशी जिल्ह्यातील स्पर्धकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!