फोंडाघाट (प्रतिनिधी) : वाघेरी गावातील वाघेरी लिंगेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता, वाघेरी चव्हाटा ते सदानंद गुरव यांच्या घराकडे जाणारा रस्ता तसेच महेश पाटील यांच्या घराजवळील बोअरवेल या विकासकामांचे लोकार्पण सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी शिवसेना उपनेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना विधानसभा प्रमुख व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संदेश पटेल, सरपंच अनुजा रावराणे, माजी सरपंच संतोषजी रावराणे, माजी सरपंच तुकाराम गुरव, पोलीस पाटील अनंत रावराणे, पोलीस पाटील अजिंक्य गुरव, उपसरपंच सौ. नेवगे, मंगेश नेवगे, किशोर राणे, सुहास रावराणे, महेंद्र रावराणे, सिद्धेश रावराणे, दिनेश रावराणे, सत्यवान गुरव, प्रणय सावंत, सचिन राणे, चंद्रकांत गुरव, महेश पाटील, बाळा रावराणे, नितीन रावराणे, शरद सावंत, प्रसाद राणे, राजा राणे, देवगडकर, शुभम रावराणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व वाघेरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलताना आग्रे यांनी सांगितले की, “वाघेरी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे.” तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांनी वाघेरी शाळेला भेट दिली, जिथे श्री. पाताडे, श्री. राणे सर व सर्व शिक्षकवर्गाने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आग्रेसाहेबांनी शाळेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पूर्ण करण्याचेही आश्वासन दिले.तसेच शाळेतील मुलांना, खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सर्व मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे हा लोकार्पण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.










