कुडाळ तालुकास्तरीय बाल कला- क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा कांदुळी शाळेचे घवघवीत यश

समूहगीत लहान गट व ज्ञानी मी होणार स्पर्धेत तालुक्यात अव्वल

कांदुळी शाळेच्या शिरपेचा दुहेरी मुकुट!

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित कुडाळ तालुकास्तरीय शालेय बाल, कला- क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव (२०२५-२६)’ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदुळी या दुर्गम भागातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या च्या कु. अर्णव अमोल खरात आणि कु.मृणाल किरण सावंत या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत सन 2025-26 ‘ज्ञानी मी होणार’ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच याच शाळेच्या लहान गटातील मुलांनी सादर केलेले समूहगीत तालुक्यात अव्वल ठरले आहे. या दुहेरी यशामुळे कांदुळी शाळेच्या विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

या यशात विद्यार्थ्यांच्या कष्टासोबतच शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक संकेत सावंत आणि कादंबरी भोसले तसेच पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शिक्षकांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळेच कांदुळी शाळेला हे यश संपादन करता आले.

या यशाबद्दल बोलताना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समिजा सावंत यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्हा स्तरावर देखील हे विद्यार्थी तालुक्याचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!