कणकवली महाविद्यालयात अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद अधिवेशनात २३६ शोधनिबंध सादर

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ व राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

या राष्ट्रीय अधिवेशनात दुबई व देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात एकूण ३९६ प्रतिनिधी अभ्यासक, प्राध्यापक सहभागी झाले होते.
या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक राणा यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांनी कोकणातील स्थानिक इतिहासाचे महत्त्व विशद केले. या वेळी अधिवेशनाचे अध्यक्ष तथा काशी विश्वविद्यालय बनारस येथील जेष्ठ अभ्यासक डॉ बिंदा परांजपे , अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुणा मोरे, सचिव डॉ.सोपान जावळे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. सतीश कदम ,प्राचार्य टी.एस. पाटील, डॉ. ग. का.माने, प्र.प्राचार्य युवराज महालिंगे,आदी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रा.डॉ.राजश्री साळुंखे उपस्थित होत्या.
या राष्ट्रीय अधिवेशनात इतिहास विषयाबरोबर आंतरविद्याशाखीय अभ्यासक सुद्धा सहभागी झाले होते. देशातील विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.

दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय अधिवेशनात प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास आणि अंतर्विद्याशाखीय विभाग या चार विभागांमध्ये एकूण अठरा सत्रांमध्ये २३६ शोध निबंध सादर झाले.यात प्राध्यापक व अभ्यासकांनी नाविन्यपूर्ण शोधनिबंध सादरीकरण करून अभ्यासकांचे लक्ष वेधले. त्यामध्ये पर्यटन विकास, स्थानिक इतिहास, आंबेडकरवादी इतिहास, स्त्रीवादी दृष्टीकोन, मराठ्यांचा सर्वांगीण इतिहास, उपेक्षित सरदार घराणे, महाराष्ट्रातील व कोकणातील किल्ले, तेथील शिल्पकला व वास्तुकला व गाळीव इतिहास, जाती व जमातीचा इतिहास, सुधारणावादी चळवळीचे जननायक, ऐतिहासिक स्मारके पर्यटन अशा विविध विषयावर सादर झालेल्या शोध निबंधाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या राष्ट्रीय परिषदेत वाचल्या गेलेल्या शोधनिबंधाचे पाच शोध मासिके प्रकाशित करण्यात आली. तसेच सिंधुदुर्गातील ऐतिहासिक व सांस्कृतिक इतिहासाला उजाळा देणाऱ्या कनक या स्मरणिकेचे प्रकाशनही या निमित्ताने करण्यात आले.

या राष्ट्रीय अधिवेशनात सत्र अध्यक्ष म्हणून श्री सदाशिव टेटविलकर डॉ.किरण जाधव डॉ. दीपक पाटील, डॉ. लक्ष्मी साळवी पाटील, डॉ. अनिल बनकर, डॉ.गीतांजली बोराडे, डॉ. प्रदीप वाघमारे, डॉ. राहुल नरंगलकर, प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपंचांग आदी मान्यवर उपस्थित होत
अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक राणा श्री जी. डी. खानदेशे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी मुंबई विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.नारायण भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री विजयकुमार वळंजू, प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी शुभेच्छा दिल्या.
या अधिवेशनात सादर केलेल्या शोध निबंधापैकी उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून तीन संशोधकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कणकवली महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा.स्वीटी जाधव यांना आधुनिक विभागातून उत्कृष्ट निबंध पुरस्काराने घडविण्यात आले.
तळ कोकणात पहिल्यांदाच झालेले हे राष्ट्रीय अधिवेशन विविध अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरले या अधिवेशनाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटन स्थळाला सुमारे ४०० अभ्यासकांनी भेट दिली.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. राजश्री साळुंखे,विजयकुमार वळंजू , सर्व विश्वस्त, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशनाचे स्थानिक संयोजक तथा मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक विज्ञान मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंबरकर, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे भाग प्रमुख डॉ.एस.टी. दिसले, डॉ. बी. एल.राठोड, डॉ. मारोती चव्हाण, डॉ. निलेश खुटाळे, प्रा.हरिभाऊ भिसे, अधीक्षक संजय ठाकूर, यांचे सह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिसर घेतले.

error: Content is protected !!