चिंदर पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा विकासाचा चेहरा…!

दिपक सुर्वे यांच्या उमेदवारीने मतदारसंघात उत्साहाची लाट

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने चिंदर पंचायत समिती मतदारसंघातून समाजाभिमुख व सातत्याने विकास कामांत सक्रिय असलेल्या, कोरोना योध्दा, लोकप्रिय दिपक भागोजी सुर्वे यांना अधिकृत उमेदवारी देत विकासाच्या दिशेने ठाम पाऊल टाकले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण मतदारसंघात चैतन्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीतर्फे उमेदवारी दाखल होताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून प्रचाराला वेग आला आहे. समाजासाठी मदतीचा हात नेहमीच पुढे करणाऱ्या आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून कार्यरत असलेले श्री दिपक सुर्वे हे विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत.

कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांचा पाठिंबा, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि महिलांची भक्कम साथ या त्रिसूत्रीच्या बळावर “विकास” हे स्पष्ट व्हिजन घेऊन चिंदर गावचे सुपुत्र दिपक सुर्वे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिंदर पंचायत समिती मतदारसंघाचा विकासला निश्चितच वेग घेईल, असा विश्वास मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!