असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात कामत कुटुंबियांकडून ब्लॅंकेटचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कामत कुटुंबियांचे आधारस्तंभ रमेश कामत यांच्या वाढदिवसानिमित्त असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील 60 आजी-आजोबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचे उद्योजक विशाल कामत यांनी सांगितले.

यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी सरपंच भगवान लोके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच सचिन परब, प्रविण डगरे, रघुनाथ लोके, वैशाली कामत, हर्षदा कामत, साईश कामत, तृप्ती कामत, अमिता नितीन शेट्ये, गणेश काटकर, राजन परब, अमोल नष्टे, वृध्दाश्रमाचे संचालक संदेश शेटये व आजी-आजोबा उपस्थित होते.

error: Content is protected !!