महाराष्ट्र व सहकार क्षेत्राची मोठी हानी: सतीश सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार आल्या नंतर सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून ते आमच्या कायम संपर्कात होते.अजितदादा पवार हे समाजाभिमुख व सहकार क्षेत्रातील एक चांगले नेतृत्व होते.सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने ते माझ्या प्रचारात आले होते. सिंधुदुर्ग बँकेच्या कामकाजा विषयी ते समाधानी होते.तसेच कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे यासाठी त्यांचे मार्गदर्शन असायचे.अजित पवार यांच्या अपघाती निधनाने प्रशासनात दरारा असणारा महाराष्ट्रातील एक दादा आपल्यातून निघून गेला आहे.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.असे नेतृत्व पुन्हा होणे नाही,अशा शब्दात सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली

error: Content is protected !!