अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

ओरोस (प्रतिनिधी) : विविध प्रकारची धमकी अल्पवयीन देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गवाणवाडी येथील मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत वय २९ याला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश एच बी गायकवाड यांनी दोषी ठरवीत २० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंड आणि हा दंड न भरल्यास अतिरीक्त ३ महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाणे अंतर्गत २२ एप्रिल २०१९ ते ८ ऑगस्ट २०२१ या दरम्यान हा गुन्हा घडला होता. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. ती २०१७ मध्ये शिक्षण घेत असताना आरोपी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत याने फिर्यादी हिचेशी ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला धमकी देवुन तसेच मारहाण करुन तिचे विवस्त्र काढलेले फोटो युटयुब, फेसबुकवर प्रसिध्द करण्याची व तिचे घरातल्या व्यक्तींना पाठविण्याची धमकी देत तिच्यावर वरील मुदतीत वारंवार शारिरीक संबंध ठेवले होते.

त्याबाबत पीडित मुलगीने ९ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय दंड विधान कलम, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ आणि अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ च्या सुधारित अधिनियम २०१५ नुसार आरोपी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सावंतवाडीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी- सावंतवाडी, डॉ. श्री. नितीन कटेकर, निवती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीम. रुपाली गोरड, पोलीस हवालदार रामचंद्र करंगुटकर, जगदिश दुधवडकर (मयत), तसेच प्रभारी अधिकारी अमोल सांळुखे यांनी केलेला आहे.

या गुन्ह्याचा तांत्रीक विश्लेषण व शास्त्रोक्त पध्दतीने तपास करुन आरोपी विरुध्द न्यायालयात सबळ पुराव्यानिशी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यांतील दोषारोप पत्रावरुन न्यायालयीन पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. जिल्हा सत्र न्यायालयात हा गुन्हा शाबित झालेला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत याचेवर दोषसिध्द झाल्याने भा.द.वि. कलम ३७६(२) (एन) व पोक्सो कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड व हा दंड न भरल्यास अतिरीक्त 3 महीने साधा कारावास तसेच भा.द.वि. कलम ५०६ (२) अन्वये १ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरीक्त १ महीना साधा कारावास अशी शिक्षा सुनावलेली आहे. आरोपीला शिक्षा झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम यांनी गुन्ह्याचे तत्कालीन तपासीक अधिकारी, पैरवी अधिकारी, सरकारी अभियोक्ता व गुन्हयाचे तपासास मदत करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!