फोंडाघाट विभागात महायुती ची प्रचारात आघाडी

घोणसरी गावात उमेदवारांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत

बबन हळदीवे मानसी मराठे यांना मतदारांची साथ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : महायुती चे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव उर्फ बबन हळदिवे आणि लोरे पंचायत समिती च्या उमेदवार मानसी बाळकृष्ण मराठे यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी घोणसरी गावात घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेतल्या. वाघेरी लोरे नवीन कुर्ली वसाहत या गावात बबन हळदीवे आणि मानसी मराठे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. विशेषतः मतदार आपुलकीने महायुती चे उमेदवार बबन हळदीवे आणि पं स च्या उमेदवार मानसी मराठे यांचे औक्षण करून स्वागत करत आहेत. वयोवृद्ध महिला- पुरुष उमेदवार हळदीवे आणि मराठे यांना विजयी भव: आशीर्वाद देत शुभेच्छा देत आहेत. घोणसरी गावात मानसी मराठे यांच्या माध्यमातून प्रथमच महिला उमेदवाराला पं स निवडणूकीची उमेदवारी देण्यात आल्यामुळे गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सौ.मराठे यांना पाठिंबा दर्शवत आहेत. लोरे पं स मधून मानसी मराठे यांच्या विजयात सर्वाधिक मतांचे लीड घोणसरी गावातून देण्यासाठी मतदार उत्सुक आहेत. मतदारांच्या आणि महायुती च्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर फोंडाघाट जिल्हा परिषद आणि लोरे पंचायत समिती मध्ये महायुती चा भगवा फडकणार असल्याचा विश्वास बबन हळदीवे आणि मानसी मराठे व्यक्त करत आहेत. प्रचारादरम्यान आमची उमेदवारी ही जनतेच्या सेवेसाठी आहे. आपल्या विभागाचा विकास पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून करण्यात कोणतीही कसर शिल्लक राहणार नाही. पालकमंत्री, खासदार मुख्यमंत्री आपलेच असून देशात सुद्धा महायुती ची सत्ता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी भरघोस विकासनिधी आणू हा विश्वास बबन हळदीवे आणि मानसी मराठे मतदारांच्या मनात निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत.

error: Content is protected !!