ग्रामदैवत गांगेश्वर मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ
कणकवली (प्रतिनिधी) : आज हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचार हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन अत्यंत उत्साहात करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य दिव्या दिनकर पेडणेकर,दिनकर (राजू) पेडणेकर, बुलंद पटेल,बाबुल पटेल, चांदसाहब पटेल,अनिल खोचरे,लियाकत पटेल, जाकीर पटेल,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकात परब,पूनम तेली,तुकाराम खोचरे, बूथ अध्यक्ष इम्रान शेख,उमेश सापळे,मामा माणगावकर,मोहसीन शेख,निलेश तेली,सरफराज शेख, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक भाजपा नीसार शेख,अरबाज खान, रेहान शेख,भाजपा कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










