वाघेरी मठखुर्द मध्ये फोडला प्रचाराचा नारळ
फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोरे पंचायत समिती च्या भाजपा शिवसेना महायुती च्या उमेदवार मानसी मराठे यांनी मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसी मराठे यांनी 29 जानेवारी रोजी वाघेरी मठखुर्द येथे आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
यावेळी जि प माजी सभापती संदेश पटेल, माजी पं स सभापती सुजाता हळदीवे वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, उपसरपंच नेवगे, शक्तिकेंद्र प्रमुख अलंकार रावराणे, बूथ अध्यक्ष चंद्रकांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य रवी सावंत प्रदीप घावरे, महेश राणे महेंद्र राणे राजेश राणे गणेश हळदीवे, भाई हळदीवे, सिद्धेश पावसकर, महेश पाटील, साई नेवगे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर पियाळी गावात घरोघरी जाऊन मानसी मराठे यांनी प्रचारादरम्यान मतदारांच्या भेटी घेतल्या. मानसी मराठे यांच्या पियाळी गावातील प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी पं स सभापती सुजाता हळदीवे सरपंच प्रवीण पन्हाळकर उपसरपंच संजय ढवण, साहिल कानडे, बाबू घाडी, विजय मुरकर, सुनील तेली तसेच पियाळी गावातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

















