प्रशासकीय ज्ञान आणि विकासकामांची जाण असलेल्या मनोज, चंद्रहास यांना भिरवंडे गावात मोठी पसंती

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर आवश्यक असते प्रशासकीय ज्ञान आणि विकासकामांची जाण. माजी सभापती असलेले आणि हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार मनोज रावराणे आणि हरकुळ पं स चे उमेदवार डामरे माजी सरपंच चंद्रहास उर्फ बबलू सावंत या जोडीला ग्रामीण विकास संकल्पनेची खडानखडा माहिती आहे. विकास कामे कशी केली जातात, विकासकामांचे प्रस्ताव कसे तयार केले जातात, प्रस्तावाना प्रशासकीय मंजुरी कशी मिळवावी लागते, आवश्यक विकासनिधी कोणत्या हेडखाली आणि कोणामार्फत आणावा लागतो या सगळ्याचे इत्यंभूत  जाणकार असलेले मनोज रावराणे आणि चंद्रहास सावंत आहेत. त्यामुळेच भिरवंडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा शिवसेना युतीचे जि प चे उमेदवार मनोज रावराणे आणि पं स चे उमेदवार चंद्रहास रावराणे यांच्या पाठीशी भिरवंडे गावातील 100 टक्के मतदार असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया भिरवंडेवासीयांनी दिली. भिरवंडे गावात मनोज रावराणे आणि चंद्रहास सावंत यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. या प्रचारादरम्यान ग्रामविकासाची आपली भूमिका मतदारांसमोर व्यक्त केली. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी आणण्याचा शब्दही मनोज आणि चंद्रहास यांनी दिला. यावेळी भिरवंडे गांधीनगर

शक्तीकेंद्रप्रमुख श्रीकांत सावंत,सरपंच मंगेश बोभाटे,उपसरपंच राजेंद्र सावंत,माजी सरपंच शेखर सावंत,मिलिंद बोभाटे, गुरु सावंत,सोशल मिडिया प्रमुख सुधीर सावंत,बाबा सावंत, अमीर सावंत,अक्षय सावंत,हर्षद सावंत,गुरू शेटये,प्रथमेश सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुनीता सावंत,मंगेश सावंत,निलेश सावंत,संदीप सावंत, छोटू सावंत,विष्णू सावंत,संतोष सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!