खारेपाटण (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील आंबोली पब्लिक स्कूल च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जुडो कराटे सर्धेत खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
आंबोली पब्लिक स्कूल येथे नुकत्याच १ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय ज्युडो कराटे स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या एकूण ७ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. हे विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कु. सुखदा संतोष राऊत (गोल्ड मेडल), समर्थ गोपालनाथ ठाकूर (गोल्ड मेडल), कु. श्रेया श्रीकृष्ण राऊत (सिल्वर मेडल), कु.मनस्वी महेश राऊत (सिल्वर मेडल), कु.मनस्वी महेश सकपाळ (प्रशस्तीपत्र), आर्यन अनिल कोवळे (ब्राँझ मेडल),हर्ष रमेश तावडे (प्रशस्तीपत्र) वरील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक शिक्षक राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तर यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.












