महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा “रंगी रंगला महाराष्ट्र” कार्यक्रम; स्वरसंधार गृप यांची ‘भक्तीगीतांची जुगलबंदी’चा कार्यक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी चौक कणकवली येथे शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. या शिवजयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा “रंगी रंगला महाराष्ट्र” कार्यक्रम व स्वरसंधार गृप कणकवली यांची ‘भक्तीगीतांची जुगलबंदी’ सादर होणार आहे.
शिवजयंती उत्सवानिमित्त सकाळी ९.३० वा. शिवप्रतिमेचे पूजन, सकाळी १० वा. रक्तदान शिबीर (सौजन्य : नवजीवन ब्लड सेंटर कणकवली), सकाळी १०.३० वा. कणकवली तालुका मराठा समाज व मराठा प्राथमिक शिक्षक समाज बांधव आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व च चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ६ वा. ‘भक्तीगीतांची जुगलबंदी’ स्वरगंधार गृप कणकवली गायक : सुंदर मेस्त्री / दुर्गेश मिठबावकर, पखवाज : तुषार लोट, तबला : मेघपर्ण एकावडे, रात्रौ ९.३० वा. ६५ कलाकारांच्या संचात साईकला मंच निर्मित साईनाथ एन्टरटेनमेंट प्रकाशित “रंगी रंगला महाराष्ट्र” महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. तरी या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने मधुसुदन (भाई) परब (९४२२३८११२४), बच्चू प्रभूगांवकर (९४२२६३२६२१), सुशिल सावंत (९१३०३९६९५८), महेंद्र सांबरेकर (९८६०३११२७७), सोनू सावंत (९४२३००००७५), बबलू सावंत (९४२२३७३१६४) यांनी केले आहे.











