श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी होममिनिस्टर स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता संस्थेचे सभासद असणाऱ्या विवाहित महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये असून पहिल्या फेरीपासूनच आकर्षक बक्षिसे उर्मिला सांबारी (आचरा), स्मिता परब (आचरा), वैशाली सांबारी (आचरा), शोभा सुखटणकर (आचरा), सीमा घुटुकडे (आचरा), सुमित्रा गुरव (आचरा), गीता खेडेकर (आचरा), अस्मिता गवस (सावंतवाडी), अंजली बापर्डेकर (आचरा), रक्षिता शानभाग (इंग्लंड), प्रणया टेमकर-मोरे (मुंबई, आचरा) यांनी प्रायोजित केली असून उपविजेत्या होम मिनिस्टरला अनिता आनंद आचरेकर (आचरा) यांजकडून सोन्याची नथ तर विजेत्या होममिनिस्टरला वैशाली देसाई (देसाई साडी सेंटर, आचरा) यांजकडून पैठणी देण्यात येणार आहे.

उपस्थित प्रेक्षक वर्गासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा असून अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांसाठी मानसी राणे (आचरा) यांजकडून तर उपस्थित विद्यार्थी वर्गासाठीही प्रश्नमंजुषा स्पर्धा असून त्यातील १० विद्यार्थ्यांना प्रज्ञा पेडणेकर (आचरा) यांजकडून आकर्षक भेटवस्तू तर सर्व सहभागी ३२ स्पर्धकांना नेहा घाडी (आचरा), सई राणे (कुलसूम नर्सरी,आचरा), स्वाती पेडणेकर (आचरा), सानिका दुखंडे (आचरा), श्रुती सावंत (ग्रा. पं. सदस्या, आचरे), किशोरी आचरेकर (ग्रा. पं. सदस्या, आचरे) यांजकडून आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत. नवनिर्वाचित जि. प. सदस्या वर्षा सांबारी, आचरा यांजकडून सर्व स्पर्धकांना व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात येणार आहे. आजच नावनोंदणी करून आपली निराशा टाळा. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ग्रंथपाल विनिता कांबळी ०२३६५-२४६०१७ / ९४२१२६३३४६ यावर संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन केले.

error: Content is protected !!