इंडिया मास्टर एथलेटिक स्पर्धेत सिंधुदुर्गचा सुपुत्र मनीष भालेकर याचे सुयश

विविध सर्धेत सिल्व्हर व कांस्य पदकांची कमाई

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली या गावचे सुपुत्र व सध्या मुंबई, वरळी येथे वास्तव्यास असलेले मनिष भालेकर यांनी दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी जबलपूर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मास्टर ॲथलेटिक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ५००० मीटर जलद चालण्याच्या कठीण शर्यतीत ३५ मिनिटांची वेळ नोंदवित दुसरे स्थान पटकावत सिल्व्हर पदक मिळवले. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

तर मनीष भालेकर यांनी यावेळी लांब उडी स्पर्धेत देखील सहभाग घेत ५ मीटर २४ सेंटीमीटर एवढी लांब उडी मारत तृतीय स्थान पटकावत कांस्य पदक प्राप्त केले. तसेच मनीष यांनी ट्रिपल जंप या तांत्रिक दृष्ट्या कठीण असलेल्या स्पर्धेतही सहभाग घेत ८ मीटर ९९ सेंटीमीटर (२९ फूट ११ इंच) एवढी लांब जंप मारत चौथ्या स्थानावर झेप घेतली. मनीष भालेकर हे उत्तम फुटबॉल खेळाडू असून मुंबई वरळीकरांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही अभिमान व गौरवाची बाब आहे.

या अगोदर महाराष्ट्र मास्टर्स राज्यस्तरीय एथलेटिक प्रतियोगिता सोमय्या विद्याविहार विश्वविद्यालयाच्या एथलेटिक ट्रॅकवर मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मनीष भालेकर यांनी १ सुवर्ण व ३ रजत पदक जिंकले होते व त्यानंतर त्यांची १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी जबलपूर मध्य प्रदेश येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय प्रतियोगिता, ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्ससाठी त्यांची निवड झाली होती. त्यांनी जबलपूर, मध्यप्रदेश येथे झालेल्या इंडिया मास्टर्स एथलेटिक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ५००० मीटर जलद चालण्याच्या कठीण शर्यतीत सिल्वर पदक जिंकले. मनीष भालेकर यांच्या या यशाबद्दल चिंचवली गावचे सरपंच अशोक पाटील व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!