शिवगर्जना मित्र मंडळ,नडगिवे यांच्यावतीने छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

छ.शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगीवे या गावातील शिवगर्जना मित्र मंडळ, नडगीवे यांच्या वतीने गुरुवार दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येणार असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या उभारणी कामाचा शुभारंभ स.१०.०० वाजता खारेपाटण जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला पंचायत समिती माजी सभापती दिलीप तळेकर,माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, नडगिवे सरपंच माधवी मण्यार, उपसरपंच भूषण कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अमित सावंत व सचिव संजय मद्रस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. शिवगर्जना मित्र मंडळ, नडगिवे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा शिवजयंती उत्सव सलग दोन दिवस चालणार असून दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वा.दीपप्रज्वलन व शिव प्रतिमेचे पूजन स.१०.०० वा. छ.शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याच्या उभारणी कामाचा शुभारंभ १०.३० वा.शिवप्रेमीच्या भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन सायं.४.०० वा.महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व सायं.५.०० खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायं.६.०० वा.स्थानिक मुलांचे संस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

तर शनिवार दि.२० फेब्रवारी २०२६ रोजी भव्य नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले असून या स्पर्धेचे हे ५ वे वर्ष असून नडगीवे बस स्टॉप शेजारी ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे असे आवाहन शिवगर्जना मित्र मंडळ नडगीवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!