प्रा. सिद्धी कदम यांचे सेट पाठोपाठ नेट परीक्षेत सुयश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुंबई विद्यापीठ संलग्न पुंडलिक आबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका सिद्धी दिलीप कदम उर्फ वैशाली सोमा तांबे यांनी युजीसी नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. युजीसी नेट ही संपूर्ण भारत देशातील प्राध्यापक पेशासाठी सर्वात काठिण्य पातळी असलेली परीक्षा आहे. या परीक्षेसाठी कठोर मेहनत जिद्द आणि चिकाटी या या त्रिसूत्रीच्या जोरावर यश मिळवता येते.प्रा.सिद्धी कदम ह्या याआधी सेट अर्थात राज्य पात्रता परीक्षा गतवर्षी 2022 साली उत्तीर्ण झाल्या आहेत.प्रा.कदम यांच्या या यशस्वीतेबद्दल संस्था चेअरमन, सहकारी प्राध्यापक तसेच समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!