नवदुर्गा युवा मंडळाकडुन आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नवदुर्गा युवा मंडळ कडुन भवानी मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी मंडळाचे पदाधिकारी रामगड येथे जावुन शिवज्योत घेवुन नऊ वाजता नवीन कुर्ली येथे आगमन झाले. मंडळाचे पदाधिकारी, सदस्य गावातील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छ. शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करुन पुजा, आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारांच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. त्यानंतर दुपारी शिवभोजन, सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू, रात्री श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ बुवा साहिल पारकर यांचे सुस्वर भजन असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी कार्यक्रमास भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले व मंडळास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, उपाध्यक्ष मंगेश मडवी, सचिव अतुल डऊर, खजिनदार अमित दळवी, विजय आग्रे, प्रशांत दळवी, सचिन साळसकर, अनिल दळवी, सचिन परब, सुहास साळसकर, दिपक शिंदे, प्रदीप आग्रे, सखाराम हूंबे, संजय मोहिते, कृष्णा परब, सतिश पिळणकर, आशिष पेडणेकर, अमित डऊर, विजय कोलते, अनंत चव्हाण, शिवाजी चव्हाण, कृष्णा पवार, राजेंद्र तेली, बाळकृष्ण चव्हाण, अंकुश दळवी, प्रकाश आग्रे, अरुण पवार, प्रकाश दळवी, सुरेंद्र पवार, अनंत दळवी, पांडुरंग कोलते, एकनाथ पवार, अरुण पाटील, विजय राणे, मधुकर शिंदे, अक्षय कोलते, मुन्ना जाधव, चंद्रकांत मर्गज आदी ग्रामस्थ तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.












