सामाजिक कार्यकर्ते, रक्तमित्र अमेय मडव “समाजमित्र” पुरस्काराने सन्मानित

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) च्या वतीने पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) हे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजमित्र पुरस्कार देऊन प्रतिवर्षी गौरव करतात. आज शिवजयंतीचे औचित्य साधत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांच्या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पार पडले. दरम्यान मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “समाजमित्र” पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अमेय मडव यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, सचिव दिपेश परब, अरुण राऊळ, दीपक राऊळ, गणेश गावडे, सतीश गावडे, विकास गावडे, पं. स. सदस्य प्रदीप गावडे, पत्रकार उमेश परब, वामन परब, दामोदर परब, बाळकृष्ण परब तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस, सहसचिव यशवंत (विनू) महाडिक आदी उपस्थित होते.

यावेळी अमेय मडव यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आणि रक्तदाना संदर्भात मार्गदर्शन केले तसेच तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!