खांबाळे सुपुत्र तेजस कांबळे यांचे NET परीक्षेत सुयश

वैभववाडी (प्रतिनिधी): विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत (NET) पर्यावरण शास्त्र विषयात खांबाळे बौद्धवाडी येथील तेजस दयानंद कांबळे उत्तीर्ण झाला असून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पाञ ठरला आहे. तेजसचे प्राथमिक शिक्षण रामकृष्ण हायस्कुल बोरीवली, उच्च माध्यमिक शिक्षण उत्कर्ष ज्युनिअर कॉलेज विरार, तर पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण विवा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज विरार येथे पुढिल शिक्षण पूर्ण केले. वडील दयानंद वासुदेव कांबळे, आई प्रज्ञा दयानंद कांबळे, काका संतोष कांबळे व काकी संजना कांबळे यांनी त्याला यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच प्रा.डॉ. दीपा वर्मा, प्रा.रोहन डीसोजा, प्रा.डॉ. निखील तेली यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तेजसचे वडील एका खाजगी कंपनीत कामाला असून आई गृहणी आहे. घरात शैक्षणिक वातावरण किंवा ट्युशन न घेता तेजसने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!